Manoj Jarange: “माझा ऐनकाऊंटर करूण किंवा माझ्या सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा कट देवेंद्र फडणवीस यांनी रचला आहे” मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप

Manoj Jarange: ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांवरून ते चर्चेत होते. त्याच्यावरती समाजातीलच काही लोकांनी गंभीर आरोप केलं होते. यावर जरांगे पाटील यांनी आज यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे आरोप केले आहेत.(Manoj Jarange: “Devendra Fadnavis conspired to kill my counter Karun or me with poison from my saline” Manoj Jarange’s serious allegations)

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange)

मनोज जरांगे यांनी आज अंतरवली येथे एक मोठी बैठक बोलावली होती. यामध्ये ते म्हणाले, मला संपवण्याचा सरकारचा प्लान आहे. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटातील दोन आमदार आणि अजित पवार गटातील दोन आमदारांचा कट असल्याचं देखील मनोज जरांगे म्हणाले. त्यामुळे आता राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Manoj Jarange: “सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा कट”

पुढे ते म्हणाले, माझा ऐनकाऊंटर करूण किंवा माझ्या सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप मनोज जरंगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. याच कारणामुळे मी सलाईन घेणं बंद केलं असल्याचं देखील ते म्हणाले आहेत. सरकार माझ्या मरणाची वाट पाहत आहे त्यांना कसही करून मला संपवाचं आहे, यामध्ये सरकारमधील मोठ्या नेत्यांचा हात असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. मी सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका असं म्हणत मनोज जरांगे यांनी मोठा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *