Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जालन्यात पेटवली एसटी बस

Maratha Reservation: जालना। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) यांच्यावर अनेक गंभीर टीका केल्या आहेत. ते मुंबईच्या दिशेने निघाले होते परंतु भांबेरीवरुन ते परत अंतरावाली सराटीत माघारी गेले. त्यांनतर अनेक मराठा आंदोलकांचे लक्ष पुन्हा जालना आणि बीड जिल्ह्यावर लागले आहे. तर काही ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. (Maratha Reservation: Maratha agitation turns violent, ST bus torched in Jalna)

दरम्यान, जरांगेच्या आक्रमक भूमिके नंतर आता मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने, काही ठिकाणी जाळपोळ केली असून राज्य परिवहन मंडळाची बस पेटविण्याचीही घटना घडली आहे. ही घटना नेमकी कोठे घडली आहे याबातब तपशील मिळू शकला नाही.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

मात्र, याबाबतीचा एक व्हिडीओ Press Trust of India या वृत्तसंस्थेने आपल्या X हँडलवर शेअर केला आहे. तो आपण येथे पाहू शकता. आंदोलन अधिक तीव्र होऊ नये यासाठी अंतरावलीकडे मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक पोहचली आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्याकडे आले आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही. Maratha Reservation

महत्वाच्या बातम्या :

(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *