Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्माने हार्दिक आणि ईशानला ठणकावले, म्हणाला, “ज्या खेळाडूंना भूक आहे त्यांनाच खेळवणार…”

Rohit Sharma Reaction Press Conference Ranchi Test: इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्याची कसोटी भारताने जिंकली आहे. या विजयामध्ये सर्वात मोठा वाट हिटमॅन कर्णधार रोहित शर्माचा आहे यात काही दुमत नाही. कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहितने आपले प्रखर मत मंडल आहे. भारताने इंग्लंडला चौथ्या कसोटी सामन्यात पाच गडी राखून पराभूत केलं. तसेच पाच सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. यासह टीम इंडियाने भारतात सलग १७ वी कसोटी मालिका जिंकली आहे. (Rohit Sharma: Skipper Rohit Sharma slams Hardik and Ishaan, says “will only play players who are hungry…”)

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंना सोबत घेऊन इंग्लंडचा चुरा केला आहे. यामध्ये सरफराज खान, ध्रुव जुरेल, य़सस्वी जयस्वाल आणि आकाशदीप या खेळाडूंनी आपली छाप पाडली. त्यामुळे रोहितने या खेळाडूंचे कौतुक देखील केले आहे. यासोबतच पैशांसाठी खरेलु क्रिकेटनं खेळणाऱ्या खेळाडूंना चांगलंच ठणकावलं आहे.

“ज्या खेळाडूंना भूक आहे त्यांनाच खेळवणार…”

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्याची कसोटी जिंकल्यानंतर रोहित शर्माने म्हंटले, “ज्या लोकांना भूक आहे आम्ही त्याच लोकांना संधी देणार.” “जर भूकच नसेल तर त्यांना खेळवून काहीच उपयोग नाही. मला या संघात भूक नसलेल्या एकही खेळाडू पाहायचा नाही. मग तो संघात असो की संघात खेळत नसू दे. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी संधी मिळतात. जर तुम्ही सिद्ध केलं नाही तर बाहेर फेकले जाल.” असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

खऱ्या अर्थाने रोहितने बीसीसीआयची री ओढली आहे. कारण काही खेळाडू रणजी ट्रॉफीकडे कानाडोळा करत आहेत. तसेच आयपीएलला महत्त्व देत असल्याचं दिसलं आहे. यामध्ये ईशान किशन आणि हार्दिक पंड्याविषयी प्रश्न विचारल्यावर रोहितें हे उत्तर दिल. पैशांच्या हव्यासापोटी युवा खेळाडूंमध्ये कसोटी न खेळण्याची स्थिती दिसते.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

पुढे रोहित म्हणाला, “टेस्ट क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने खेळाडूची कसोटी लागते. जर तुम्हाला या फॉरमॅटमध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्या विजयाची भूक असायला हवी. हे लगेच कळतं की कोणाला भूक नाही आणि कोणाला येथे राहायचं नाही. ज्यांना भूक आहे. कठीण प्रसंगात खेळायचं त्यांना संधी मिळेल. हे अगदी सोपं आहे. आयपीएल चांगलं आहे यात शंका नाही. पण कसोटी एक कठीण फॉरमॅट आहे. मागचे तीन विजय सहज मिळाले नाहीत. दीर्घ गोलंदाजी आणि बॅट्समनला घाम गाळावा लागला आहे. हे खरंच कठीण आहे.”

महत्वाच्या बातम्या:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *