Ajay Devgn: एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरामध्ये चांगलाच धुमाकूळ घेतला होता. एस. एस. राजमौलींच्या(S. S. Rajamouli) या चित्रपटाने केवळ प्रेक्षक-समीक्षकांकडूनच या चित्रपटाचं कौतुक झालं नाही, तर गोल्डन ग्लोब(Golden Globe) आणि ऑस्करसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने भारताची मान उंचावली आहे.(Ajay Devgn: Ajay Devgn took tabl 4.35 crores for every minute of his role in RRR)
दरम्यान, ‘RRR’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. याचित्रपटामध्ये साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर(Junior NTR) आणि रामचरण(Ramchran) हे मुख्य भूमिकेमध्ये होते. यासोबतच यामध्ये काही बॉलिवूड (Bollywood) चेहरेसुद्धा पाहायला मिळाले होते. यात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांचा समावेश होता. यामध्ये अजय देवगणने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. परंतु अवघ्या काही मिनिटांच्या या भूमिकेसाठी त्याने तगडं मानधन घेतल्याचं समोर आलं आहे.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
त्याचबरोबर, ‘गेट्स सिनेमा’(Gates Cinema)च्या एका पोस्टनुसार, अजय देवगणने (Ajay Devgn) या भूमिकेसाठी तब्बल ३५ कोटी रुपये स्वीकारले होते. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय, ‘अजय देवगणने RRR या चित्रपटातील आठ मिनिटांच्या भूमिकेसाठी तब्बल ३५ कोटी रुपये घेतले होते. म्हणजेच एका मिनिटासाठी त्याने ४.३५ कोटी रुपये मानधन घेतले होते. मात्र, या पोस्टवर अद्याप निर्माते-दिग्दर्शिक एस. एस. राजमौली (S. S. Rajamouli) किंवा अजय देवगणकडून (Ajay Devgn) कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.
RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा १९२० चा काळ कसा होता हे दाखवण्यात आले आहे. यामध्ये अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती याची कथा फिरते. जरी ही कथा काल्पनिक असली तरी यातून इतिहासाला उजाळा देण्याचं काम करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर (Oscar) पुरस्कार मिळाला होता. Ajay Devgn
महत्वाच्या बातम्या:
- Bade Miyan Chote Miyan: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये झाली चेंगराचेंगरी
- Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्माने हार्दिक आणि ईशानला ठणकावले, म्हणाला, “ज्या खेळाडूंना भूक आहे त्यांनाच खेळवणार…”
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)