Red ball cricket: इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यातील पहिला सामना भारताने गमावला होता. मात्र हिटमॅन रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाने विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. यासोबतच इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्याची मालिका देखील जिंकली. टीम इंडिया आता या 5 सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे. भारताच्या या विजयानंतर BCCI ने एक मेगा प्लॅन तयार केला आहे. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.(Red ball cricket: BCCI’s mega plan! Dutch will be given to ‘these’ three players)
दरम्यान, बीसीसीआयने काही माजखोर खेळाडूंना वठणीवर आणण्यासाठी आणि निष्ठेने खेळणाऱ्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. बीसीसीआयच्या या प्लान मध्ये काही स्टार खेळाडूंचा देखील समावेश आहे. बीसीसीआयने आपल्या या प्लान द्वारे कुणाला न दुखावत पण अद्दल घडवण्यसाठी सज्ज झाली आहे. यामध्ये ईशान किशन , श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्याचं नावं चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसआय अध्यक्ष जय शाह म्हणाले होते की, वार्षिक करारप्राप्त खेळाडूंना रणजी आणि इतर रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळावं लागेल. मात्र त्यानंतरही ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी माजखोरी करत या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे वर्ल्ड कपमध्ये दुखापतग्रस्त झालेला हार्दिक पंड्या हा आयपीएलच्या तोंडावर पुन्हा फिट झाला आहे. परंतु या खेळाडूंची रेड बॉलबद्दल असलेली अनास्था समोर आली आहे.
त्यामुळे आता रेड बॉल क्रिकेटच्या संवर्धनासाठी बीसीसीआय नवा फंडा आणायच्या तयारीत आहे. वर्षभरात सातत्याने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्यांना अतिरिक्त रक्कम देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. तर पैशांसाठी खेळणाऱ्या या तिन्ही खेळाडूंना डच्चू देण्यासाठी BCCI त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
याचंबरोबर, टीम इंडियाच्या खेळाडूंना वार्षिक करारात श्रेणीनुसार कमाल ७ आणि किमान १ कोटी रुपये मिळतात. येवढंच नाही तर प्रत्येक टी २०, वनडे आणि कसोटी सामन्यसाठी अनुक्रमे ३, ९ आणि १५ लाख खेळाडूंना दिले जातात. परंतु पैशांसाठी काही खेळाडू कसोटीऐवजी टी २० लीग स्पर्धेला प्राधान्य देतात. अशा माज खोरांना वटणीवर आणण्यासाठी BCCI त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करू शकते. त्यामुळे आत ईशान किशन , श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांना डच्चू बसण्याची शक्यता आहे. Red ball cricket
महत्वाच्या बातम्या:
- Bade Miyan Chote Miyan: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये झाली चेंगराचेंगरी
- Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्माने हार्दिक आणि ईशानला ठणकावले, म्हणाला, “ज्या खेळाडूंना भूक आहे त्यांनाच खेळवणार…”