Chiplun Accident: देशामध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडल्याने अनेक अपघात होत असतात. यामध्ये अनेक ठिकाणी काही विचित्र अपघात देखील होत असतात. अशा अपघातांचे व्हिडीओ देखील माध्यमांच्या माध्यमातून आपल्या समोर येतं असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ चिपळूण मधून समोर आला आहे.(Chiplun Accident: In accidents, driver comatose rickshaw; Incident in Chiplun, watch the video once)
दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, चिपळूणमध्ये एका रिक्षाची आणि दुचाकीची जबर धडक झाली आहे. या अपघातात दुचाकी बाजुला जाऊन पडली तर रिक्षा जागेवरच गोल फिरत राहते. या अपघाताचा व्हिडीओही समोर आलाय जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. चिपळूण मधील चिंच नाका परिसरात हा अपघात झाला आहे.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की, भरधाव जाणाऱ्या दुचाकीवर रिक्षा धडकल्यानंतर रिक्षाचालक बाहेर फेकला गेला. काही काळ रिक्षा जागेवरच गोल फिरत होती, मात्र आजूबाजूच्या सतर्क नागरिकांनी धावत जखमींना मदत केली. अपघातामुळे फिरत असलेल्या रिक्षाला नागरिकांनी वेळीच पकडल्यामुळे रिक्षातील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. Chiplun Accident
महत्वाच्या बातम्या:
- Ola Electric Scooter Caught Fire: चालू असतांनाच ओला इलेक्ट्रिक स्कूटरने घेतला पेट; कोणतीही जिवीत हानी नाही
- Red ball cricket: BCCI चा मेगा प्लॅन! ‘या’ तीन खेळाडूंना देणार डच्चू
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)