IPL 2024 : आयपीएलमधील ‘हे’ 5 स्टार भारतीय खेळाडू जे कधीच आपल्या घरच्या संघाकडून खेळले नाहीत

भारतीय खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलमध्ये त्यांची क्षमता दाखवण्याची भरपूर संधी मिळते. तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळताना आयपीएलमुळेच अनेक खेळाडूंची जागतिक क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र या लीगमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेत ठसा उमटवलाय, परंतु ते कधीही आपल्या घरच्या संघाकडून खेळू शकले नाहीत. चला तर मग, आज अशा पाच भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

1. विराट कोहली

विराट कोहली हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याला आयपीएलमध्ये त्याच्या घरच्या संघाकडून खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. कोहलीला आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं खरेदी केलं. तेव्हापासून तो आरसीबीसोबतच आहे. 2008 च्या लिलावात कोहलाचा घरचा संघ दिल्लीकडे त्याला विकत घेण्याची संधी होती, मात्र त्यांनी त्यावेळी प्रदीप सांगवानवर विश्वास दाखवला आणि विराट आरसीबीच्या संघात दाखल झाला.

2. दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक देखील अशा खेळाडूंपैकी एक आहे, जो कधीही त्याचा घरचा संघ चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकला नाही. 2022 च्या लिलावात, सीएसकेनं कार्तिकला विकत घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. टीमनं त्याच्यावर 5.25 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, आरसीबीनं चेन्नईपेक्षा जास्त बोली लावून या यष्टिरक्षक फलंदाजाला आपल्या संघात समाविष्ट केलं. कार्तिक आयपीएलमध्ये सहा संघांसाठी खेळला आहे, (दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, गुजरात लॉयन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) मात्र त्याला त्याच्या राज्याच्या संघाकडून खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. हे आयपीएलचं सीजन कार्तिकचं अखेरचं असू शकतं.

3. हरभजन सिंग

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगही आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळू शकला नाही. भज्जी या लीगमध्ये मुंबई इंडियन्स, केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. पण हरभजनला त्याच्या घरच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकली नाही.

4. जसप्रीत बुमराह

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आक्रमणाचा नेता मानला जाणारा जसप्रीत बुमराह हा देखील अशा खेळाडूंपैकी एक आहे जो आयपीएलमध्ये त्याच्या राज्याच्या संघाकडून खेळू शकला नाही. बुमराह गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मात्र त्याला अद्याप आयपीएलमध्ये या संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.

5. शुबमन गिल

शुबमन गिल हा देखील अशा खेळाडूंपैकी एक आहे जो अद्याप आयपीएलमध्ये त्याच्या घरच्या संघाकडून खेळू शकलेला नाही. गिल इंडियन प्रीमियर लीगमध्ये केकेआर आणि गुजरात टायटन्सकडून खेळला आह. पण त्याला पंजाब किंग्जकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *