भारतीय संघाने रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली आहे.
धरमशाला कसोटी सामन्यात इंग्रजाचा तीन दिवसात खेळ खल्लास झाला. तत्पूर्वी, चारही सामने चौथ्या दिवसापर्यंत गेले होते. टीम इंडियाचा हा विजय खूप ऐतिहासिक आहे कारण कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षांनंतर, पहिल्या कसोटी सामन्यात पराभवानंतर संघाने 4-1 पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे. याबरोबरच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माला पाठदुखीचा त्रास झाल्याने चाहत्यांना टेन्शन आलं आहे.
अशातच अवघ्या दहा दिवसांनी आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. पहिला सामना 24 मार्चला होणार आहे. असं असताना रोहित शर्मा तिथपर्यंत बरा होईल ना? अशी चिंता चाहत्यांना खात आहे. मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदाच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माला त्याच्या नेतृत्वात फलंदाजीसाठी उतरण्याची रणनिती आखली गेली होती. पण असं घडल्याने मुंबई इंडियन्सचीही धाकधूक वाढली आहे.
दरम्यान, रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पुन्हा एकदा टी20 ची धुरा सांभाळली आहे. तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शतकी खेळी केली. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकाही जिंकली आहे. पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली. 162 चेंडूत 103 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :