मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी हा अटीतटीचा सामना अखेर बरोबरीत

पुणे (9 मार्च 2024) – आज पाचव्या दिवशी दुसरा सामना मुंबई शहर विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झाला. दोन्ही संघाच्या दृष्टीने आजचा सामना महत्वपूर्ण होता. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पहिल्या पाच मिनिटाच्या खेळात मध्ये दोन्ही संघांनी केवळ 3-3 गुण मिळवले होते. रत्नागिरी कडून चढाईपटूंनी तर मुंबई शहराच्या पकडपटूंनी गुण मिळवत सामन्यांत रंगत आणली आहे.

पहिल्या हाय मध्ये सामना अतिशय रंगतदार झाला. 7-7 नंतर 9-9 असा सामना सुरू होता. मध्यंतरापुर्वी रुपेश साळुंखे ने हाय फाय पूर्ण करत तर स्पर्धेतील आज पहिल्याच सामना खेळत असलेल्या राज आचार्य जे चढाईत गुण मिळवत आपल्या संघाला 17-14 अशी आघाडी मिळवून दिली होती. मध्यंतरा नंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटची तीन मिनिटं शिल्लक असताना 25-28 असा पिछाडीवर असलेल्या रत्नागिरीच्या श्रेयस शिंदे 4 गुणांची सुपर रेड करत सामन्याला कलाटणी दिली.

मुंबई शहराच्या राज आचार्य ने चढाईत गुण मिळवत सामना 29-29 असा बरोबरीत आणला. त्यानंतर राज आचार्य ची पकड करत रत्नागिरी ने पुन्हा आघाडी घेतली होती. रत्नागिरीच्या शेवटच्या चढाईत श्रेयस शिंदे लॉबीत गेल्याने मुंबई शहर ला सुपर टॅकलचे दोन गुण मिळण्याने मुंबई शहर आघाडीवर आला होता. मुंबई शहरच्या तुषार शिंदेंची सामन्याच्या शेवटच्या चढाईत श्रीपाद कुंभार ने उत्कृष्ट पकड करत सामना 31-31 असा बरोबरीत सोडला. रत्नागिरी संघाने सलग दुसऱ्या दिवशी अंतिम चढाईत सामना बरोबरीत सोडवला.

बेस्ट रेडर- राज आचार्य, मुंबई शहर
बेस्ट डिफेंडर- रुपेश साळुंखे, मुंबई शहर
कबड्डी का कमाल- श्रीपाद कुंभार, रत्नागिरी

युवा कबड्डी सिरीज बद्दल सर्व Live Update मिळवण्यासाठी Yuva Kabaddi Series चे अधिकृत अँप डाऊनलोड करा.

महत्वाच्या बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *