पुणे (9 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज पाचव्या दिवशी अहमदनगर संघाने विजयाचा चौकार मारत प्रमोशन फेरीतील स्थान निश्चित केला. रत्नागिरी विरुद्ध मुंबई शहर मधील सामना बरोबरीत सुटला. सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी संघाचे सामने बरोबरीत राहिले. बीड संघाने चौथा विजय मिळवत प्रमोशन फेरीतील आपले स्थान निश्चित केले. रायगड संघाने दुसरा विजयासह टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत.
आजच्या पहिल्या सामन्यात अहमदनगर संघाने या स्पर्धेतील सर्वात मोठा 53 गुणांच्या फरकाने विजय मिळवला. तर प्रफुल झवारे ने एकाच सामन्यात चढाईत 23 गुण मिळवत या स्पर्धेत चढाईत 50 गुणांचा पल्ला पार केला. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी संघाने पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला सामना बरोबरीत करत विरुद्ध संघाचा विजय हिसकावून घेतला. रत्नागिरी कडून अभिषेक शिंदे ने सर्वाधिक 9 गुण मिळवले तर श्रेयस शिंदे ने 7 गुण मिळवले. मुंबई शहरच्या राज आचार्य ने सुपर टेन तर रुपेश साळुंखे ने हाय फाय पूर्ण केला.
आजचा तिसरा सामना सुरुवातीला अत्यंत चुरशीचा झाला. 22-22 अश्या बरोबरी नंतर रायगड संघाने 41-24 अश्या फरकाने जिंकत गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. राज जंगम रायगडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तर आजच्या चौथ्या लढतीत बीड संघाने जालना संघाचा 55-30 असा धुव्वा उडवला. प्रमोशन फेरी साठी आता अ गटातील उर्वरित दोन जागांसाठी रत्नागिरी, मुंबई शहर, रायगड, नांदेड व धुळे या संघाच्यात चुरस बघायला मिळणार आहे.
संक्षिप्त निकाल:
अहमदनगर जिल्हा 62 – धुळे जिल्हा 09
मुंबई शहर 31 – रत्नागिरी जिल्हा 31
रायगड जिल्हा 41 – नांदेड जिल्हा 26
बीड जिल्हा 50– जालना 22
युवा कबड्डी सिरीज बद्दल सर्व Live Update मिळवण्यासाठी Yuva Kabaddi Series चे अधिकृत अँप डाऊनलोड करा.
महत्वाच्या बातम्या :