Mumbai Indians: IPL 2024 ची सर्व क्रिकेटप्रेमीं मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांनीच जगातील सर्वात मोठी लीग म्हणजेच IPL 2024ची सुरवात 22 मार्चला होणार आहे. यावेळी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indian)कर्णधारपद सांभाळणार आहे. मुंबईने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून बाजूला करत हार्दिकला कॅप्टन केलं. त्यामुळे मुंबईचे चाहते नाराज देखील झाल्याचं समोर आलं होते. अशातच आता सूर्याबाबत एक वाईट बातमी समोर आल्याने हार्दिकची डोकेदुखी वाढली आहे. (Mumbai Indians: Suryakumar Yadav will not play IPL 2024? Hardik’s headache increased)
Mumbai Indian: सुर्यकुमार यादव खेळणार नाही IPL 2024?
जागतिक क्रिकेट मध्ये धुमाकूळ घालणारा मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) संघाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव IPL 2024 मध्ये खेळणार नसल्याची बातमी समोर आली आहे. अनेकदा सुर्यकुमार यादव याने 360 डिग्री स्टाईल फलंदाजी करत दाखवून दिलं आहे. वर्ल्ड कपनंतर सुर्याकडे टी-20 टीमचं कर्णधारपदही देण्यात आलं होतं.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा-https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
दरम्यान, या दौऱ्यानंतर सुर्यावर हर्नियाची सर्जरी झाली होती. या सर्जरीमुळे तो क्रिकेटपासून दूर गेला होता, परंतु सध्या तो फिट असल्याचे समोर आले आहे. मात्र संघासाठी एक वाईट अपडेट आहे, सुर्या हा पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे आता हार्दिकची डोकेदुखी वाढली आहे. परंतु तो लवकरचं आपल्याला मैदानावर दिसण्याची शक्यता आहे. Mumbai Indian
महत्वाच्या बातम्या:
- Vasant More left MNS: वसंत मोरें काँग्रेसच्या वाटेवर?
- Haryana BJP- JJP Break Up: जागावाटपा वरून भाजप शिंदे पवारांची युती तुटणार?