Mahayuti seat Sharing Formula: देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार कमला लागले आहेत. महाराष्ट्रा मध्ये देखील जागा वाटपावरून जोरदार राजकारण पेटले आहे. कारण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये लोकसभा जागा वाटपावरून अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. अशातच आता येत्या एक-दोन दिवसात महायुतीचा जागा वाटपाचा पेच सुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(Mahayuti: Will BJP swallow Shinde’s Shiv Sena? Statistics add to the headache)
दरम्यान, महायुतीमध्ये भाजपला सर्वात जास्त ३४ एकनाथ शिंदेंना ८-९ तर अजित पवारांना ३-४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तोटा होण्याची शक्यता आहे. कारण सध्या शिंदेंकडे १३ खासदार आहेत. परंतु त्यांना फक्त ८-९ जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्त्यावण्यात येत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला गिळणारं असल्याच्या चर्चा देखील जोरदार होताना दिसत आहे.
एवढंच नाही तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई मध्ये लोकसभेच्या एकूण ६ जागा आहेत त्यातील शिवसेनेला फक्त १ जागा भाजप शिवसेनेला देणार असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. एकनाथ शिंदे गट काही जागांवर दावा सोडायला तयार नाहीय. पण कोण निवडून येऊ शकतो? त्या आधारावर जागा वाटप व्हाव, यासाठी भाजपा आग्रही आहे.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
शिंदेंसोबत गेलेल्या ‘या’ खासदारांचे सीट धोक्यात (सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार)
१. भावना गवळी (यवतमाळ लोकसभा)
२. गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा)
३. धेर्यशील माने (हातकणंगले लोकसभा)
४. श्रीरंग बारणे (मावळ लोकसभा)
५. सदाशिव लोखंडे (शिर्डी लोकसभा)
६. हेमंत गोडसे (नाशिक लोकसभा)
७. राजेंद्र गावित (पालघर लोकसभा)
महत्वाच्या बातम्या :
- Mumbai Indians: सुर्यकुमार यादव खेळणार नाही IPL 2024? हार्दिकची वाढली डोकेदुखी
- Vasant More left MNS: वसंत मोरें काँग्रेसच्या वाटेवर?