पुणे (1३ मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 (Yuva Kabaddi Series) मध्ये आजपासून ‘ब’ गटातील सामान्यांना सुरुवात झाली. मागील वर्षीचा उपविजेता नाशिक संघ विरुद्ध कोल्हापूर यांच्यात पहिला सामना झाला. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. दोन्ही संघांनी तिसऱ्या चढाईत आपल्या संघाचे खाते उघडले. कोल्हापूरच्या सौरभ फगारे ने चतुरस्त्र चढाया करत चांगले गुण मिळवले. नाशिकच्या शिवकुमार बोरगोडे ने चढाईत गुण मिळवत सामन्यात रंगत आणली होती.(K. M. P. Kolhapur team’s winning debut in Yuva Kabaddi Series 2024)
कोल्हापूर संघाने 11 व्या मिनिटाला नाशिक संघाला ऑल आऊट करत 12-06 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर नाशिक संघाच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ करत 06-15 पिछाडी वरून मध्यंतरापर्यत 16-18 अशी पिछाडी कमी केली. मध्यंतरापूर्वी नाशिक संघाने कोल्हापूर संघाला ऑल आऊट केले होते. मध्यंतरा नंतर दोन्ही संघाच्या मध्ये चांगली चुरस बघायला मिळाली. सौरभ फगारे व ओंकार पाटीलच्या सुपर टेन खेळीच्या जोरावर कोल्हापूर ने नाशिक संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत सामन्यात निर्यायक आघाडी मिळवली.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा-https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
उत्तरार्धात सामना चांगला रंगदार झाला होता. शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना 35-27 अशी आघाडी कोल्हापूर संघाकडे होती. नाशिकच्या सौरभ फगारे ने सुपर रेड करत आपल्या पिछाडी कमी करत संघाचा पराभव 7 गुणांच्या कमी फरकाने करण्यात यश आले. अखेर सामना कोल्हापूर संघाने 37-33 असा जिंकला. सौरभ फगारे व ओमकार पाटील चढाईत उत्कृष्ट खेळ केला तर दादासो पुजारी ने 6 पकडी करत हाय फाय पूर्ण केला.
बेस्ट रेडर- सौरभ फगारे, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- दादासो पुजारी, कोल्हापूर
कबड्डी का कमाल- शशिकांत बारकंड, नाशिक
महत्वाच्या बातम्या :
- Mahayuti: भाजप शिंदेंच्या शिवसेनेला गिळणारं? आकडेवारीने वाढली डोकेदुखी
- Road Accident: IPS अधिकाऱ्याला मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीने उडवलं; व्हिडीओ व्हायरल
युवा कबड्डी सिरीज बद्दल सर्व Live Update मिळवण्यासाठी Yuva Kabaddi Series चे अधिकृत अँप डाऊनलोड करा.