पुणे (1३ मार्च 2024) – Yuva Kabaddi Series 2024: ‘ब’ गटातील लढती मध्ये आज पहिल्या दिवशी शेवटचा सामना धाराशिव विरुद्ध लातुर यांच्यात झाला. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली होती. दोन्ही संघाच्या बचावपटूंनी विरुद्ध संघाच्या चढाईपटूंना बाद करत आपल्या संघाचे खाते उघडले. 5 मिनिटांच्या खेळानंतर 2-2 असा सामना संथ सुरू होता. धाराशिव संघाकडून निलेश व्हारे ने चढाईत उत्कृष्ट खेळ दाखवत संघाला गुण मिळवून दिले.(Yuva Kabaddi Series 2024: Latur beat Dharashiv in Yuva Kabaddi Series)
मध्यंतरा पर्यत चांगला चुरशी खेळ बघायला मिळाला. लातूर संघाने 15-12 अशी आघाडी घेतली होती. लातूर संघाने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करत धाराशिव संघाला ऑल आऊट केले. शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना लातूर संघाकडे 26-19 अशी आघाडी होती. प्रदिप आकांगिरेच्या उत्कृष्ट खेळीने लातूर संघाने सामन्यावर पकड मजबूत केली.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा-https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
धाराशिव संघाने उत्तरार्धात चांगला प्रतिकार केला मात्र त्याना पराभावाला सामोरे जावे लागले. लातूर संघाने 35-31 असा विजय मिळवला. लातूर कडून प्रदिप आकांगिरेने चढाईत सर्वाधिक 16 गुण मिळवले. तर रोहित पवार ने 5 पकडी केल्या. धाराशिव संघाकडून निलेश व्हारे ने सर्वाधिक 19 गुण मिळवले. जगदीश काळे ने अष्टपैलू खेळ करत 10 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- निलेश व्हारे, धाराशिव
बेस्ट डिफेंडर- रोहित पवार, लातूर
कबड्डी का कमाल- जगदीश काळे, धाराशिव
महत्वाच्या बातम्या:
- Yuva Kabaddi Series: पालघर संघाचा सातारा संघावर एकतर्फी विजय
- Yuva Kabaddi Series: चुरशीच्या लढतीत नंदुरबार संघाची सांगली संघावर मात
युवा कबड्डी सिरीज बद्दल सर्व Live Update मिळवण्यासाठी Yuva Kabaddi Series चे अधिकृत अँप डाऊनलोड करा.