‘दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते तुमच्या सारख्या कावळ्यांना नाही’ ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल

ट्रेंडिंग महाराष्ट्र। खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खूप बोचरी टीका केली. त्यामुळे सध्या यावरून एक नव्या वादला सुरवात झाली आहे. ‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “लंका त्यांचीच आहे, आम्ही हुनमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना रामायण, महाभारात वाचाव लागेल” असं संजय राऊत म्हणाले. त्यावर ज्योती वाघमारे यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Jyoti Waghmare’s attack: ‘Beards suit Shiva Raya’s mavla, not crows like you’)

नेमकं काय म्हणाल्या ज्योती वाघमारे

संजय राऊतांवर सडकून टीकाकरताना शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या, “दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते, तुमच्या सारख्या कावळ्यांना नाही. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे, महात्मा फुले, गुरुगोविंद सिंग, गुरुनानक तसेच नवनाथांनाही दाढी होती. तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ”

पुढे त्या म्हणाल्या, “तुम्ही काडी लावत जा, आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ. तुम्ही जाळण्याची भाषा करा आणि आम्ही महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू. इथून पुढे जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही” असा हल्लबोल त्यांनी राऊतांवर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *