अशोक चव्हाण आज भाजपत प्रवेश करणार?आमदारकीचाही दिला राजीनामा?

ट्रेंडिंग महाराष्ट्र। राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत. अशातच आता काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडताना दिसत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला असल्याच्या चर्चा सुरु आहेत.(Ashok Chavan will join BJP today? Resigned from MLA too?)

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशोक चव्हाण नॉटरिचेबल आहेत. अशातच भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्ष प्रवेशाची तयारी सुरु आहे. त्यामुळे आता काँग्रेसला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एवढंच नाहीतर अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी उलथा पालथं होण्याची शक्यता आहे. हा फक्त काँग्रेस लाच मोठा धक्का नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *