U19 World Cup। टीम इंडियाच्या नावावर नकोस शर्मनाक विक्रम

खेळ। काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने सिनिअर मेन्स क्रिकेट मध्ये भारताला धूळ चारली. त्यांनतर आता अंडर १९ ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचं स्वप्न भंग केलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर ७९ धावांनी मात करत चौथ्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे पुन्हा सर्व भारतीयांचे ह्रदय तुटले आहे. एवढंच नाही तर या मॅच भारताच्या नावावर एक नकोसा शर्मनाक विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. (U19 World Cup. Don’t have a shameful record in the name of Team India)

ऑस्ट्रेलियाने गेल्याने ८ महिन्यात टीम इंडियाला तिसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत केलं. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, वनडे वर्ल्ड कपनंतर आता अंडर १९ वर्ल्ड कप अशा एकूण ३ महाअंतिम सामन्यात टीम इंडिया अपयशी ठरली. तर ऑस्ट्रेलियाची अंडर १९ वर्ल्ड कप जिंकण्याची ही चौथी वेळ ठरली. टीम इंडियाच्या नावावर या पराभवासह नकोसा विक्रम झाला आहे.

नक्की काय झालं?

अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हंगामात टीम इंडियाची सलामी जोडी अर्धशतकी भागीदारी करु शकली नाही. टीम इंडियासाठी या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये अर्शीन कुलकर्णी आणि आदर्श सिंह या जोडीने ओपनिंग केली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात तर कहरच केला. टीम इंडियाने पहिली विकेट अवघ्या ३ धावांवरच गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळू शकली नाही.

दरम्यान, आदर्श सिंह याने अंतिम सामन्याआधी उर्वरित स्पर्धेत २ वेळा अर्धशतकी खेळी केली. तर अर्शीनने यूएसए विरुद्ध शतक ठोकलं होतं. दोघांनी वैयक्तिक पातळीवर फलंदाजी केली. मात्र या दोघांना ओपनिंग पार्टनरशीप करुन देता आली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *