Crime News: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर। देशभरामध्ये गुन्हांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आता पुन्हा राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मात्र नंतर पुण्यात चांगली नोकरी लागल्यानंतर प्रेयसीला वाऱ्यावर सोडणाऱ्या एका प्रियकराविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, नमन विनोद संगोत्रा (22, रा. द्विवेदी कॉलनी, गोरेवाडा रोड, गिट्टीखदान) असे या संशयित आरोपी प्रियकराचे नाव आहे. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरूं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी नमन आणि जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 22 वर्षीय युवती हे एकाच ठिकाणी काम करत होते.

दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे त्यांची अधिक जवळीक वाढली. पीडित तरुणीच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे ती आपल्या मावशीकडे राहत होती. युवती आणि नमन हे मिहान परिसरातील एका खासगी कंपनीत सोबत काम करायचे. त्यासाठी ते दररोज एकाच बसमध्ये ये-जा करीत असल्यामुळे त्यांच्या कायम एकमेकांशी संपर्क होता. याच संधीचा फायदा घेत नमनने अधिक जवळीक साधत तरुणीला अनेक आश्वासन दिले. त्यानंतर नमनने युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  दरम्यान नमनने अनेकदा युवतीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

परंतु जेव्हा नमनला युवतीने लग्नाबाबत विचारणा केली असता तो कायम उडवा-उडावीचे उत्तर देत असे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यावेळी नमनने लग्नास नकार देऊन दिला. हे समजताच तरुणीला जबर धक्का बसला. त्यानंतर तरुणीने हिम्मत करत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि नमन विरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *