माझी शेती। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशभरात लोकप्रिय ठरली आहे. तसेच या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. योजनेतंर्गत किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकरी या मदत निधी कुठे खर्च करतात. त्याचा कसा वापर करतात हे समोर येणार आहे.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. काही कारणांमुळे या योजनेचा लाभ थांबविण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून, अडचण सोडविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहिम राबविणार आहे. येत्या 12 फेब्रुवारीपासून ही खास मोहिम राबविण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी या योजनेचा ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले आहेत.
दरम्यान, पीएम किसान योजनेतंर्गत 15 हप्ता जमा करण्यात आला आहे. आता या योजनेचा 16 हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. याबरोबरच, कृषी मंत्रालयानुसार, 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल.
हप्ता बंद होण्याचे कारण काय
- शेतकऱ्यांचा हप्ता बंद होण्याची दोन महत्वाची कारणे आहेत
- पहिले कारण e-kyc संबंधीचे आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन घ्या
- बँक खाते आधार कार्डशी लिंक न केल्याने हप्ता बंद झाला असेल
- 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान अभियान सुरु असेल
- सेवा केंद्रावर हे अभियान चालविण्यात येईल, त्याठिकाणी समस्या सोडविण्यात येईल
- जिल्हा प्रशासन याविषयीची माहिती देणार आहे
- समस्या दूर झाल्यास शेतकऱ्यांना थांबलेल्या हप्त्याची रक्कम पण मिळेल