Manoj Jarange:‘महाराष्ट्रात मोदींच्या सभा होऊ देणार नाही’ मनोज जरांगे यांचा इशारा

ट्रेंडिंग महाराष्ट्र। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकार मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहेत. गेले चार दिवस ते उपोषणाला बसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपोषण मागे घावे यासाठी सरकारच्या वतीने आज विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे आले होते. (Manoj Jarange: ‘Modi’s meetings will not be allowed in Maharashtra’ Manoj Jarange warns)

दरम्यान, जोपर्यंत आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात मोदींच्या (PM Modi) सभा होऊ देणार नाही असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे. ते म्हणाले, “काय नुसतं चाललं आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या (PM Modi) सभा होऊ देणार नाहीत”

Manoj Jarange: “आम्हाला दोन हजार पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे आहेत”

पुढे मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार(DCMAjit Pwar), मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा घोटाळा मागे घेतला. पाच महिने झाले प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला राज्य शांत बघायचे नाही. पाच महिन्यांपासून फक्त प्रक्रिया सुरू आहे. आम्ही पण पोलीस विरोधात बीड आणि राज्यभर केस करायच्या आहेत. आमचेपण डोके फोडले आहेत. आम्हाला दोन हजार पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे आहेत”

Manoj Jarange: ‘तुम्ही १५, १६ तारखेनंतर बघा मराठे काय आहेत’

“शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत? सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तर इकडे यायचे. तुम्ही १५, १६ तारखेनंतर मज्या बघा. दोन दिवसांत अधिवेशन घेणार होते. घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही १५, १६ तारखेनंतर बघा”, असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *