वाहतूक पोलिसांनी पकडले म्हणून तो पोलिसांनाच चावला Video Viral

Viral News। अनेकदा आपण पाहिले असेल प्रवासादरम्यान काही लोक मुद्दाम हेल्मेट न घालणे, गाडी वेगात चालवणे, ट्रॅफिक नियम तोडणे असे प्रकार करत असतात. अशा अनेकांना वाहतूक पोलीस (Traffic Police) दंड भरण्यास सांगतात. पण, स्वतःची चूक स्वीकारणं सोडा अनेक दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांशी वाद घालतात. अशीच एक घटना आज बंगळुरूमध्ये घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल (Viral on social media) होत आहे. (As he was caught by the traffic police, he bit the police himself Video Viral)

दरम्यान, विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असलेल्या वाहतूक पोलिसाच्या (Traffic Police) हाताला करकचून चावा घेतल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना बंगळुरु (Bangalore) शहरातील एका रस्त्यावर घडली. सदर वाहतूक पोलीस कर्तव्यावर होता आणि दुचाकीस्वाराचे छायाचित्र टीपणे हा त्याच्या कामाचा भाग होता. सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) झालेल्या एका व्हिडिओमध्ये गुन्हेगार पोलीस हवालदाराचा हात चावताना दिसत आहे.

तसेच आरोपीने पोलिसाचा (Traffic Police) मोबाईल हिसकावून त्याच्यावर हल्ला केला. विल्सन गार्डन ट्रॅफिक पोलिस हद्दीत सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. बेंगळुरू पोलिसांनी (Bangalore Police) एस सय्यद शफी या आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सय्यद रफी हा प्रवासी हेल्मेट न घालता प्रवास करत असतो. तर वाहतूक पोलीस कर्मचारी विल्सन गार्डन १०th ग्रॉस येथे त्याला थांबवतात आणि त्याच्या दुचाकीची चावी जप्त करतात. पोलिसांनी अडवले म्हणून प्रवासी दुचाकीवरून उतरतो आणि गैरवर्तन करतो. त्यामुळे हे भांडण टोकाला जाताना दिसते. बघता बघता प्रवासी रागात ट्रॅफिक पोलिसांचा (Traffic Police) हात पकडतो आणि त्यांचे बोट चावतो. Video Viral

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *