Bailgada Sharyat: नाद एकच बैलगाडा शर्यत! विजेत्यास मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट, कुठे आहे ही स्पर्धा?

Bailgada Sharyat Kasegaon: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तालुका-गाव पातळीवर बैलगाडा शर्यत प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे हौशी लोक अशा बैलगाडा शर्यतीच सातत्याने आयोजन करत असतात. बैलगाडा शर्यतीची ग्रामीण भागात प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेते जनमानसात आपली ओळख निर्माण करतात. अशा शर्यतीतून बैलगाडा मालकांना मोठ्या रक्कमाची पारितोषिक मिळतात. त्यामुळे बैलगाडा शौकीन लोक अशा स्पर्धेत शेकडोंच्या संख्येने हजेरी लावत असतात.

दरम्यान, आत्ता पर्यंत बैलगाडा शर्यतीमधील विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात आली आहेत. मात्र, प्रथमच बैलगाडा शर्यतीमधील विजेत्यास चक्क 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सांगलीच्या कासेगाव मध्ये या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. जयंत केसरी असं या बैलगाडा स्पर्धेच नाव आहे.

कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७ फेब्रुवारी रोजी या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्ध्येमध्ये पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या बैलगाडी मालकाला १ BHK फ्लॅट देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला ७ आणि ५ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

राज्य भरातून अनेक बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. येवढंच नाही तर कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून २०० हुन अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार असून यासाठी १० एकरावर मैदान तयार करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *