Viral Video: गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी पकडलं रंगेहाथ अन् झालं ‘मोये मोये’

Viral News : आजकाल अनेक लोक प्रेमाच्या नावाखाली काहीतरी छपरीपणा करत असतात. एवढंच नाहीतर आजकाल कोण कोणावरती प्रेम करेल याचा देखील काही नेम नाही. टाईमपाससाठी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवण्याच्या सध्या ट्रेंडच असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. सध्या या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (Viral Video: Girlfriend’s family caught red-handed and became ‘Moye Moye’)

दरम्यान, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला तिच्या घरी गेला. मात्र नशीब गांडू तो क्या करेगा पांडू ही म्हण त्याला चांगलीच लागू होते. कारण गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं आणि मुलीशी लग्न लावून दिलं. नेमकी गेम येथेच झाली कारण त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं मात्र रंगेहाथ पकडल्यावर त्याला तिच्याशी लग्न करावं लागलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

sarif_video नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, तरुण तरुणीचं लग्न सुरु आहे. मात्र खरंतर तरुणाच्या चेहऱ्यावरुन तो लग्न करण्यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे. तो रडत रडत तरुणीशी लग्नगाठ बांधतोय. बॉयफ्रेंड खरंतर त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला आला होता. मात्र तिच्या घरच्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं आणि तिच्याशी थेट लग्नच लावून दिलं. त्यामुळे त्याचा इथेच मोये मोये झाल्याचं दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *