IND vs ENG : भारताचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या भारतीय संघामध्ये नेमकं काय सुरु आहे हेच कळायला जागा नाहीये. कारण उद्या भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना राजकोट (Rajkot) येथे होणार आहे. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार जसप्रीत बुमराह अजून देखील राजकोट पोहचलेले नाहीत. येवढंच नाही तर जसप्रीत बुमराह टीमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा दिसलेला नाहीत.(IND vs ENG: Where exactly has Jasprit Bumrah disappeared to?)
दरम्यान, क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच टीम इंडियात दाखल होईल, बीसीसीआय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. टीम इंडिया ११ फेब्रुवारीपासूनच राजकोट (Rajkot) मध्ये आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आज टीममध्ये दाखल होईल असं बोलल जातय. आधी असं बोलल जात होतं की, बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी आराम दिला जाईल. पण आता तो IND vs ENG या कसोटीत खेळणार हे निश्चित आहे. बुमराहला रांची कसोटीत आराम दिला जाऊ शकतो.
IND vs ENG: म्हणून टीम इंडियाला बुमराह हवाच
आत्ता पर्यंतच्या या टेस्ट सीरीजमध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) जबराट कामगिरी केली आहे. तो या सीरीजमधील टॉप विकेट-टेकर आहे. स्पिन फ्रेंडली विकेटवर या गोलंदाजाने दोन कसोटीत तब्ब्ल १५ विकेट घेतलेत. मागच्या कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये त्याने ६ विकेट घेतल्या होत्या. टीमच्या विजयात त्याच महत्त्वाच योगदान होतं. त्यामुळेच टीम इंडियाने सीरीजमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे भारतीय संघाला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) उद्याच्या टेस्ट मध्ये महत्वाचा आहे.