Bachchu Kadu: मोदींच्या योजनांवर बच्चू कडूंचा सवाल म्हणाले, या भिकारचोट योजना बंद करा

Bachchu Kadu aggressive against PM Modi : अमरावती। भाजपचे अनेक नेते तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मोदी की गॅरंटी म्हणत देशातील जनतेला अश्वस्त करत असतात. परंतु त्यांचेच मित्र पक्षाच्या नेत्यांनी मोदी गॅरंटीवरून चांगलेच खडसावले आहे. एवढंच नाही तर मोदींच्या गॅरंटी बंद देखील करण्यास सांगितले आहे. ‘केंद्र सरकार अपयशी ठरलं असून भिकारचोट योजना बंद करा, अशी जहरी टीका प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी मोदींवर केली आहे.(Bachchu Kadu : Bachchu Kadu’s question on Modi’s schemes said, stop this begging scheme)

दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारला (PM Narendra Modi) हा सवाल केला. येवढंच नाहीं तर दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. यावरून देखील बच्चू कडू यांनी मोदींना सवाल केला आहे. “आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने निर्णय घेतला पाहिजे. नाही तर आम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी होऊ,” असा थेट इशाराच त्यांनी भाजप सरकारला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अनेक गोष्टींची गॅरंटी घेत आहेत. मग हमीभावाची गॅरंटी का घेत नाहीत ? असा खोचक सवाल करत बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली आहे. ते पुढे म्हणाले, हे सरकार पूर्ण फेल झालं आहे. मी जरी सरकारमध्ये असलो तरी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही चांगल्या योजना दिल्या नाहीत. भिकारचोट योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्या. शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाहीत. उलट त्यांचं व्याज कट होतं. सरकारने डाकेखोरी बंद केली पाहिजे, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.

MLA Bachchu Kadu: अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील प्रवेशावरही टीका

दरम्यान, यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील प्रवेशावरही टीका केली. विकासाचं जाळ आहे, त्या जाळ्यात ते अडकले आहेत. विकासाच्या जाळ्यात अडकल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, असा चिमटा बच्चू कडू यांनी काढला. अशोकराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ते भाजपामध्ये का गेले? त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण लोकांच्या मनात भ्रम आहे. तुम्ही दोन वेळा मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये का गेले? ते स्पष्ट झालं पाहिजे, असं देखील आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) म्हणाले.

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *