Yamuna Express Toll: देशभरा मध्ये अनेक मोठं मोठ्या महामार्गांवर आपल्याला टोल पाहायला मिळत असतात. अनेकदा असे टोल कधी राजकारणाचे विषय होतात तर कधी टोल भरण्याच्या नावावरून सतत टोलनाक्यावर वाद होत असतात. अशा प्रकारचे व्हिडीओ देखील अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ यमुना एक्स्प्रेसवरील टोलचा व्हायरल झाला आहे. (Yamuna Express Toll: Violent scuffle between toll staff and passengers caught on camera)
दरम्यान, ही घटना यमुना एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील टोल प्लाझा (Yamuna Express Toll) येथे घडली आहे. टोल प्लाझावर कर्मचारी आणि तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना यमुना द्रुतगती मार्गावरील जेवर टोल प्लाझा येथे घडल्याचे समोर आले आहे.
व्हिडीओ मध्ये कार चालकाने पळून जाताना टोल कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घातल्याचे दिसत आहे. या घटनेमध्ये टोल कर्मचारी जमिनीवर पडल्याचे देखील दिसत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कर्मचारी आणि प्रवाश्यामध्ये जोरात भांडण सुरु असल्याचे दिसत आहे. ही घटना सोमवारी (12 फेब्रुवारी) सायंकाळी 4 च्या सुमारास जेवर पोलिस स्टेशन हद्दीतील जेवर टोल प्लाझा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जेवर पोलिस स्टेशन हद्दीतील जेवर टोल प्लाझा येथे कर चालक आणि टोल कर्मचारी यांच्या मध्ये टोल मागितल्याच्या रागातून भांडण झाल्याचे समोर आले आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Yamuna Express Toll