Snatch Gold Chain: देशामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतंच चालले आहे. दिवसा ढवळ्या खून, चोऱ्या,, दरोडे यांसारख्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे देशातील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. सध्या अशा घटनांचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. असाच एका चोरीचा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदौर मधून समोर आला आहे. (Snatch Gold Chain: A woman snatched a gold chain after seeing her alone, the incident was caught on CCTV)
समोर आलेल्या माहितीनुसार, इंदौर येथे बुधवारी उशिरा रात्री एका डेंटिस्टच्या गळ्यातील सोन साखळी दोन चोरटयांनी लंपास केली. ही घटना लासुदिया परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही थरारक घटना जवळच्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
हेही पहा :- Yamuna Express Toll: टोल कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी घटना कॅमेरात कैद
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदौरमधील लासुदिया परिसरात बुधवारी उशिरा रात्री एका डेंटिस्टच्या गळ्यातील सोन साखळी दोन चोरटयांनी हिसकावून नेहली. पूजा गुप्ता असं महिलेचे नाव आहे. तीच्या घरापासून काही मीटर अंतरावर ही घटना घडली. दोन जण बाईकवरून आले आणि जबरदस्तीने तिच्या सोन्याची चैन ओढून नेली. जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेची टँकर देखील महिलेने जवळच्या पोलिस ठाण्यात दिली. Snatch Gold Chain