Alipur Fire News: दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये तब्ब्ल ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे. (Alipur Fire News: 11 workers died due to a fire factory fire, 2 injured)
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर दिल्लीच्या अलीपूर (Alipur Fire News) भागातील दयाल मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीत (Alipur Fire Incident) ही घटना घडलीये. गुरुवारी सायंकाळी उशिरा मार्केटमध्ये भीषण आग लागली. आग लागल्यानंतर एकही कामगार कारखान्यातून (Paint and Chemical Godowns) बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वात भयानक बाब म्हणजे मृतांचे शरीर इतके होरपळले आहे की,अद्याप मृत कामगारांची ओळख पटलेली नाहीये. या घटनेमुळे परिसरामध्ये धुराचे चांगले लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि रात्री नऊच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांनतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, दिल्लीचे डीसीपी रवी कुमार (DCP Ravi Kumar) यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होतं. ही एक मजली इमारत होती, जिथं पेंट निर्मिती केली जात होती. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीपूरच्या दयाल मार्केटमध्ये लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झालाय, तर चार कामगार जखमी आहेत. घटनास्थळी बचावकार्य अद्यापही सुरू आहे.
Alipur Fire News: घटनेचा व्हिडीओ समोर :-