NZ vs SA: केन विल्यमसनने टाकले सचिन आणि स्मिथला मागे; ३२ वे कसोटी शतक झळकावून रचला इतिहास

NZ vs SA : 2nd Test: दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड टीम (NZ vs SA) विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. कारण, दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने (Ken Williamson) जबरदस्त शतक झळकावले आहे, हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील ३२ वे शतक आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी डावात हा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. (Nz vs SA: Ken Williamson dropped Sachin and Smith behind; History of 32nd Test century)

दरम्यान, याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नावावर होता, तसेच स्मिथने १७४ व्या डावात आपले ३२ वे कसोटी शतक झळकावले होते. तर केन विल्यमसनबद्दल सांगायचे झाले तर, गेल्या ७ कसोटीतील त्याचे हे ७ वे शतक आहे. तसेच केन विल्यमसनच्या या शतकाच्या जोरावर न्यूझीलंड दुसरी कसोटीही (NZ vs SA : 2nd Test) जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा सामना जिंकून यजमान संघ दक्षिण आफ्रिकेचा सफाया करेल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही आपले वर्चस्व कायम ठेवेल.

तसेच केन विल्यमसनने (Ken Williamson) चौथ्या डावात सर्वाधिक शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावातील विल्यमसनचे हे ५वे शतक आहे .या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खान पहिल्या क्रमांकावर होता, मात्र आता विल्यमसनने त्याची बरोबरी केली आहे.

दरम्यान, या शतकासह केन विल्यमसन (Ken Williamson) फॅब-४ मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तसेच स्मिथ आणि विल्यमसन यांच्या नावे प्रत्येकी ३२ शतके आहेत. तर रूटच्या नावे ३० कसोटी शतके आणि विराट कोहलीची २९ कसोटी शतके आहेत. तसेच कोहली वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळत नाहीये.

दरम्यान, हॅमिल्टन येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यजमान संघाने ३ गडी गमावून २०० हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात केन विल्यमसनच्या शतकाचा समावेश आहे. या सामन्यात न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. NZ vs SA : 2nd Test

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *