Pune Accident: रास्ता ओलांडणाऱ्याला उडवलं दुचाकीने; अपघाताची थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Pune Accident: अनेकदा रस्ता ओलांडताना अनेक अपघात होत असतात. अशा घटनांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सहजच पोहचत असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे. यामध्ये एका दुचाकी स्वराने अचानक रास्ता ओलांडणाऱ्याला उडवले आहे. (Pune Accident: A person crossing the road was blown away by a bike; The thrilling incident of the accident was caught on CCTV camera)

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना पुण्यातील मगरपट्टा रस्त्यावर घडली. एक तरुण पहाटेच्या सुमारास मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेला. त्यावेळी तरुण रस्ता ओलांडताना ही घटना घडली आहे. या अपघाताची घटना रस्त्याच्या जवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

हेही पहा :- Snatch Gold Chain: एकट्या महिलेला पाहून हिसकावली सोनं साखळी, घटना सीसीटीव्हीत कैद

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक तरुण रस्त्याचे नियम न पाळता रास्ता ओलांडताना दिसत आहे. तेवढ्यात समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्याला उडवले. धडक इतक्या जोरात होती की, तरुण रस्त्याच्या पुढे फेकला गेला. त्यासोबत दुचाकीस्वार खाली पडला. अपघात पीडित गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे रास्ता ओलांडताना नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. Pune Accident

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *