Borivali Fire: इमारतीच्या पार्किंगला आग; २५ ते २६ गाड्या जळून खाक Video Viral

Borivali Fire: राज्यामध्ये दिवसेन दिवस आगीच्या घटनांन मध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे लाखोंच्या संपत्तीची राक होत आहे. अशा घटनांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. अशीच एक आगीची घटना आज मुंबईतील बोरिवली (Borivali) येथे एका पार्किंग मध्ये घडली आहे. यामध्ये जवळपास २५ ते २६ गाड्या जाळून खाक झाल्या आहेत.(Borivali Fire: Building parking lot fire; 25 to 26 cars burnt Video Viral)

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील बोरिवली (Borivali) येथील एका पार्किंगला शुक्रवारी संध्याकाळी आग (fire) लागली. या आगीत सुमारे 25 ते 26 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आग एवढी भयंकर होती की परिसरामध्ये धुराचे लोट पसरले.

त्याचबरोबर, वेगाने पसरणारी आग आटोक्यात आणण्यासाठी तीन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीच्या दृश्यांमध्ये गोंधळाची दृश्ये दिसून आला. काही वेळाकरीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या याचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ मध्ये आपण देखील पाहू शकता आगीची तीव्रता किती आहे. Borivali Fire

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *