IND Vs ENG: राजकोट कसोटी मधून 500 विकेट पूर्ण करणारा गोलंदाज रविचंद्र अश्विनीने ‘या’ कारणांमुळे सोडला कसोटी सामना

Ravichandran Ashwin Mother Hospitalized: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना (IND vs ENG) राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळला सुरु आहे. पहिल्या दोन दिवसांच्या खेळात दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली. मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे तिसरा कसोटी सामना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या याबाबतची अधिकृत माहिती BCCI ने दिली आहे. (IND Vs ENG: Ravichandran Ashwin, who completed 500 wickets in Rajkot Test, quits 3rd Test due to ‘these’ reasons)

दरम्यान, बीसीसीआयने याबाबत म्हंटले आहे की, ‘कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे रविचंद्रन अश्विनने तत्काळ कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि टीम इंडियाने त्यांचा स्टार गोलंदाज अश्विनला पूर्ण पाठिंबा दिला आहे. BCCI भारतीय संघाचा चॅम्पियन क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाला आपला पाठिंबा देत आहे. खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य आणि कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बोर्ड अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते. कारण तो आणि त्याचे कुटुंब या आव्हानात्मक काळातून जात आहे.

BCCI बोर्डाने पुढे लिहिले की, टीम इंडिया आणि बीसीसीआय अश्विनला सर्व आवश्यक सहाय्य प्रदान करेल. आवश्यकतेनुसार मदत करेल. टीम इंडिया या संवेदनशील वेळी चाहते आणि मीडियाच्या समजूतदारपणाचे आणि सहानुभूतीचे कौतुक करते. त्यामुळे आज पासून तो आपल्याला तिसऱ्या कसोटीमध्ये खेळताना दिसणार नाही.

IND vs ENG: ५०० वी विकेट घेत रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास

दरम्यान, काल दुसऱ्या दिवसाच्या खेळात रविचंद्रन अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५०० वी विकेट घेत इतिहास रचला आहे. ५०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो जगातील नववा आणि दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. हा विक्रम साधल्यानंतर त्याने हे यश आपल्या वडिलांना समर्पित केले आणि त्याचवेळी आपल्या त्याने आईच्या तब्येतीबद्दलही सांगितले. त्यांनतर या कसोटीतून त्याने माघार घेतली आहे. अशा परिस्थितीमध्ये इंग्लंडलाही हा कसोटी सामना जिंकण्याची संधी असेल. IND Vs ENG

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *