Mumbai Fire: मुंबई येथील गोवांडी येथे लागलेल्या आगीत १० ते १५ घरांचे मोठे नुकसान 

Mumbai-Govandi Fire: महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशीच एक घटना मुंबई(Mumbai Fire) येथील गोवांडी परिसरात असलेल्या बैंगनवाडी येथे घडली आहे. या घटने मुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या आगीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. (Mumbai Fire: Heavy damage to 10 to 15 houses in Gowandi, Mumbai)

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई येथील गोवांडी परिसरात असलेल्या बैंगनवाडी येथे शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १० ते १५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागली होती. यामध्ये अनेक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आलं आहे.

दरम्यान, वेळीच बचाव आणि मदतकार्य सुरु झाल्याने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु अनेक घरांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर नागरिकांनी देखील आग वीजवण्यासाठी मदत केली. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

त्याचबरोबर, अशीच एक घटना काल (शुक्रवारी) बोरिवली येथे घडलेली. येथे एका खुल्या पार्किंगला लागलेल्या आगीत २० हून अधिक दुचाकीं जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे येथे देखील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. Mumbai Fire

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

  • (“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *