Ajit Pawar:”अजित पवारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला” भाजप नेत्यांचा आरोप

BJP’s warning to Ajit Pawar: महायुतीत बारामती लोकसभेची जागा अजित पवार (Ajit Pawar) गटाला मिळणार आहे. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती लोकसभेची फिल्डिंग लावताना दिसत आहेत. त्यामळे अजित पवारांचे सातत्याने बारामती तालुक्याचे दौरे, विकासकामांचा आढावा, नव्या कामांचं भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम जोरदार सुरु आहेत. या मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी भाऊ आणि बहिणीत अशी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीवरून भाजप नेत्याने अजित पवारांना मोठा इशारा दिला आहे. (Ajit Pawar: “Ajit Pawar stabbed us in the back” BJP leaders allege)

दरम्यान, भाजप नेत्याने अजित पवारांवर (Ajit Pawar) मोठा आरोप करत इशारा देखील दिला आहे. इंदापूरचे(Indapur) माजी आमदार आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि पुणे भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी अजित पवारांवर मोठा आरोप केला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंकिता पाटील-ठाकरे

“आम्ही पूर्वी आघाडीत होतो आणि आता महायुतीत एकत्र आहोत. मागच्या तिन्ही वेळेस अजित पवार (Ajit Pawar) यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आमचे जे उमेदवार जाहीर (इंदापूरमध्ये) होतील त्या उमेदवारासाठी ते आमची मदत करणार असतील, विधानसभेला ते आमची मदत करणार असतील तरच आम्ही लोकसभेला त्यांचं काम करू.” असा थेट इशारा अंकिता पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे.

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *