Maratha Aarakshan : आज आरक्षण नाही दिलं तर उद्या…; अधिवेशना आधी जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Maharashtra Assembly Adhiveshan on Maratha Reservation: आज मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) देण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे आजचा दिवस मराठा समाजासाठी फार महत्वाचा मानला जात आहे. परंतु आजच्या अधिवेशनाआधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी पत्रकार परिषद घेत, सरकारला एक मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे आता राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या आधिवेशनाकडे सर्वच लोकांचे लक्ष लागलेलं आहे.(Maratha Aarakshan : If reservation is not given today, tomorrow…; Jarange Patil’s warning to the government before the session)

अधिवेशना आधी जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) आज राज्यसरकारने विशेष अधिवेशन बोलावलेल असताना, आता मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला आहे. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, यावेळी सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) द्यावं. अन् सगेसोयरे अंमलबजावणी आधी करावी. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दुसऱ्या सत्रात घ्यावं. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली होती. त्याची अंमलबजावणी करावी. सगळे आमदार, मंत्री यांनी हा विषय लावून धरावा, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हंटले.

पुढे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण ही मागणी लावून धरावी. मागणी वेगळी आणि तुम्ही वेगळं करताय. हे मराठा बघेल आणि तुम्ही मराठा विरोधी हे लक्षात येईल. कोण काय बोलतं याकडे समाजाचं लक्ष आहे. आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारला सुद्धा माहिती आहे. डबल माहिती करून घेऊ नका. आज करोडो मराठ्यांची मागणी आहेत. आमचं आलेलं ओबीसी आरक्षण द्या. या अधिवेशनात हा विषय तातडीने घ्या.

माध्यमांनी नव्या आरक्षणाने न्याय का मिळणार नाही? असा प्रश्न विचारला असता. त्यावर ते म्हणाले, ती मागणीच नाही ना… कसा न्याय मिळेल? या आधी काय झालं? आरक्षण मिळालं, शिकले, निवड झाली. एक उदाहरण सांगतो. Ecbc मधून एका विद्यार्थ्याची निवड झाली. गावाने वाजतगाजत मिरवणूक काढली. ते अजून गावीच गेलं नाही, कारण नियुक्ती मिळाली नाही. त्याचं जमलेलं लग्न अजून झालं नाही. त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. असं देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. Maratha Aarakshan

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *