Uddhav Thackeray: “उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह परत मिळेल”

Uddhav Thackeray Will Get Back Shiv Sena Name: काही महिनांपुर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जो निर्णय दिला तो चुकीचा आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना हे पक्षनाव तसंच धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळेल असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे.(“Uddhav Thackeray Shiv Sena name and bow and arrow party symbol returned”)

नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?

“शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देऊन राहुल नार्वेकरांनी खूप मोठी चूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा तो अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यात दोन गोष्टी होत्या. भरत गोगावलेंना व्हिप म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं. तसंच एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता देणंही बेकायदेशीर आहे सांगितलं होतं.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे १० व्या सूचीनुसार पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्याने राहुल नार्वेकरांनी शेवटचा निकाल द्यावा म्हणून त्यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं. सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे म्हटलं होतं की अध्यक्षांनी निर्णय द्यायचा आहे कारण हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण आहे. मात्र राहुल नार्वेकर म्हणतात हे पक्षांतर बंदी कायद्याचं नाही त्यामुळे कुणीच अपात्र नाही. हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे. दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे.” असं असीम सरोदे यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले, “राहुल नार्वेकरांना एक प्रश्न विचारला पाहिजे की हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचं नव्हतं तर मग त्यांना निर्णय देण्याचा कुठलाच अधिकार राहात नाही. त्यांनी एक ओळ लिहून सर्वोच्च न्यायालयाला सांगायला हवं होतं की हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचं नाही त्यामुळे मी ठरवू शकत नाही. संपूर्ण निर्णय त्यांना घ्यायचाच अधिकार नाही. जसा निर्णय त्यांनी शिवसेनेच्याबाबतीत दिला तसाच राष्ट्रवादीबाबतही दिला आहे जो बेकायदेशीर आहे.”

“उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह परत मिळेल”

“उद्धव ठाकरेंना राजकीय पक्षाचा व्हिपही मिळेल, राजकीय पक्षाचं नावही मिळेल आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळेल. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याला अनुसरुनच आता पुढचा निर्णय घेतला जाईल. एकनाथ शिंदे औट घटकेचे राजे आहेत असं समजू शकतो.” असं देखील सरोदे म्हणाले.

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *