Goregaon Film City: गोरेगाव फिल्म सिटीत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

Goregaon Film City Accident: मुंबई मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या प्रसिद्ध अशा गोरेगाव फिल्म सिटीत आज एक वाईट घटना घडली आहे. गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भिंत कोसळल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवढंच नाही तर या घटनेत एक जण जखमी असल्याचीदेखील माहिती समोर आली आहे.(Goregaon Film City: Two killed in wall collapse in Goregaon Film City)

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत मृत्यू झालेले दोघेजण हे मजूर होते. त्यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव फिल्म सिटीत मोठमोठे चित्रपट, प्रसद्धी टीव्ही मालिकांचं चित्रीकरण कायम सुरु असतात. असं असताना तिथे अशी घटना घडल्याने कला विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

Goregaon Film City Accident: नेमकं झालं काय?

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, गोरेगाव फिल्म सिटी(Goregaon Film City Accidenta)मधील प्राइम फोकस लिमिटेड येथील इमारतीची भिंत कोसळली आहे. यामध्ये संतू मंडल आणि जयदेव मंडल अशी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर विक्रम मंडल हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही आज संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी झाल्याचा सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आता घटनास्थळी तपास करत आहे. तसेच गटनेमागचे नेमके कारण काय याचा देखील तपशील अधिकारी घेत आहेत. परंतु या घटनेने कला विश्वातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. Goregaon Film City Accident

महत्वाच्या बातम्या :-

(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *