WPL 2024, RCBW vs UPW: खेळ। वुमन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध युपी वॉरियर्स (RCB vs UPW) यांच्यामध्ये झाला. या अतितटीच्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने युपी वॉरियर्सवर २ धावांनी विजय मिळवला आहे. युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय फेल गेल्याचं दिसतं आहे. (WPL 2024 RCB vs UPW: RCB resounding win over UP Warriors by 5 runs; Shobhana Asha became the X factor)
दरम्यान, बंगळुरुने २० षटकात ६ गडी गमवून १५७ धावा केल्या आणि विजयासाठी १५८ धावांचं आव्हान दिलं. युपी वॉरियर्सला २० षटकात ७ गडी गमवून १५५ धावा करता आल्या. शेवटच्या पाच षटकात झटपट विकेट गमवल्याने युपीचा बेंगळुरूने थेट कार्यक्रम केला. युपीकडून कोणलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही त्यामुळे इथेच यांचा पराभव झाला.
शोभना आशा ठरली एक्स फॅक्टर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरवात फारशी चंगली झाली नाही. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सोफी डिव्हाईन पायचीत होत पव्हेलियनमध्ये परतली. तिला फक्त एक धाव करण्यात यश आलं. त्या पाठोपाठ कर्णधार स्मृती मंधाना फक्त १३ धावा करून बाद झाली. तसचे एलिसा पेरीही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. तिला फक्त ८ धावा करता आल्या.
दरम्यान, संघाची स्थिती नाजूक असताना सब्बीनेनी मेघना आणि रिचा घोष या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची खरी एक्स फॅक्टर ठरली शोभना आशा कारण बंगळुरुकडून शोभना आशाने ४ षटकात २२ धावा देत ५ गडी बाद केले आणि आपल्या संघाला पहिली विजयी सुरवात दिली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅक्ग्रा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, सायमा ठाकोर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, शोभना आशा, रेणुका ठाकूर सिंग. WPL 2024 RCB vs UPW
महतवाच्या बातम्या :
- Suicide Video in Mumbai: तरुणाचा पुलावरून उडीमारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न Viral Video
- Goregaon Film City: गोरेगाव फिल्म सिटीत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)