Viral News: अनेकदा आपण पाहिलं असेल की लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये गायक आपल्या चाहत्यांसाठी खूप काही वेगवेळ्या गोष्टी करत असतात. अनेकदा असे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ असे देखल असतात ज्यामध्ये काहीवेळा लोक गैर वर्तन करत असतात. पण आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) त्याच्या चाहत्याला मारताना दिसत आहे.(Aditya Narayan: Aditya Narayan kills fan at live concert; Video Viral)
दरम्यान, गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) त्याच्या रागामुळे अनेकदा चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा त्याने असे केल्याने त्याला सोशल मीडियावरती चांगलेच ट्रोल केले जात आहे. आदित्य नारायणचा हा व्हिडिओ एका कॉन्सर्टचा आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.एवढंच नाही तर आदित्यने रागाने चात्याचा फोन देखील फेकून दिल्याचे दिसत आहे.
आदित्य नारायणच्या या व्हिडीओ मुळे तो पुन्हा एकदा ट्रोल्सच्या कचाट्यात आला आहे. या वीकेंडला आदित्यने छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महाविद्यालयीन कार्यक्रमात भाग घेतला. यादरम्यान आदित्य नारायणला एका चाहत्यावर राग आला आणि त्याने चाहत्यावर हल्ला केला. स्टेजवर गाण गाताना त्याने प्रथम चाहत्याच्या हातावर माइक मारला, नंतर त्याचा फोन हिसकावून तो फेकून दिला. ज्या तरुणावर आदित्यने राग काढला तो म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान आदित्य नारायणचा व्हिडिओ बनवत होता.
दरम्यान, ही गोष्ट आदित्यला आवडली नाही. त्याने त्याच्या चाहत्यावर हल्ला केला. आदित्यची ही कृती पाहून सोशल मीडिया यूजर्सकडून संताप व्यक्त होत आहे. या कॉन्सर्ट मध्ये आदित्य शाहरुख खानच्या डॉन चित्रपटातील ‘आज की रात’ गाणे सादर करत असल्याचे देशात आहे.