श्रेयस तळपदेच्या पत्नीने केला अक्षय कुमारबद्दल मोठा खुलासा; म्हणाली…

पिक्चर बिक्चर। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत धमाकेदार भूमिका करणारा अभिनेता श्रेयस तळपदे याला काही दिवसांपुर्वीच चित्रपटाची शूटिंग झाल्यावर ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर चाहत्यांमध्ये मोठी चिंता ही बघायला मिळाली. श्रेयस तळपदे याच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहते हे सतत प्रार्थना करताना दिसले. हेच नाही तर ‘क्लिनिकली डेड’ असल्याचे देखील श्रेयस तळपदे याला सांगितले होते. आता श्रेयस तळपदे याचे आरोग्य चांगले आहे. श्रेयस तळपदे व्यायाम आणि आरोग्याकडे प्रचंड लक्ष देतो, तरीही त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

श्रेयस तळपदे याची पत्नी दिप्ती तळपदे हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना दिप्ती तळपदे ही दिसली आहे. दिप्ती तळपदे म्हणाली की, श्रेयशला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर सतत अक्षय कुमार यांचा फोन येत होता.

हेच नाही तर दिप्ती आपण श्रेयस तळपदेला शिफ्ट करू असेही म्हणून अक्षय कुमार विचारत होता. त्यानंतर सकाळी पण अक्षय कुमारचा फोन आला. अक्षय कुमार म्हणाला की, फक्त दोन मिनिटे मला श्रेयसला बघू द्या. मला त्याला फक्त बघायचे आहे. मी त्यानंतर अक्षयला बोलले.

दरम्यान, मी अक्षयला सांगितले की, जेंव्हा श्रेयसला भेटण्याची इच्छा आहे तेंव्हा येऊ शकतात. हेच नाही तर दिप्ती तळपदे हिने सांगितले की, डायरेक्टर अहमद खान आणि त्यांच्या पत्नी रात्री 11 वाजता श्रेयसला भेटण्यासाठी रूग्णालयात आले होते. यावेळीच्या अनेक गोष्टी शेअर करताना दिप्ती तळपदे दिसली.

श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता बघायला मिळाली. मुंबईतील एका खासगी रूग्णालयात श्रेयस तळपदे याच्यावर उपचार करण्यात आले. श्रेयस तळपदे याच्या प्रत्येक हेल्थ अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा होत्या. श्रेयस तळपदे याच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहते हे प्रार्थना करताना दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *