AUS vs WI: T20I मध्ये वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धक्कादायक विजय, डेव्हिड वॉर्नरची शानदार खेळी व्यर्थ

खेळ। ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI) यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा पर्थ येथे खेळला गेला आहे. तसेच मालिका गमावलेल्या वेस्ट इंडिजकडून आज तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली आहे. याबरोबरच, नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो सुरुवातीला चुकीचा असल्याचे दिसत होता.

प्रथम खेळताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 बाद 220 धावा केल्या. याचे श्रेय आंद्रे रसेल आणि शेरफेन रदरफोर्ड या जोडीला जाते. या दोघांनी जबरदस्त फलंदाजी करत टी-20 मध्ये सहाव्या विकेटसाठी भागीदारीचा विश्वविक्रम केला आहे. याबरोबरच, वेस्ट इंडिजची नवव्या षटकात एके काळी धावसंख्या 79/5 झाली होती, आणि संघ खूप अडचणीत असल्याचे पहायला मिळत होते.

याबरोबरच, रसेल आणि रदरफोर्ड यांनी 139 धावा जोडल्या आणि सहाव्या विकेटसाठी T20I मधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही केला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या झेवियर बार्टलेटने दोन बळी घेतले. त्याच वेळी, ॲडम झाम्पाने 65 धावा खर्च करून त्याच्या संघातील सर्वात महागड्या T20I स्पेलचा विक्रम केला आहे.

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरसह कर्णधार मिचेल मार्श (17) यांनी 68 धावांची सुरुवात केली, त्यानंतर ॲरोन हार्डी (16) सोबत धावसंख्या 100 च्या पुढे नेली. यादरम्यान, वॉर्नरने आपल्या कारकिर्दीतील 26 वे T20I अर्धशतक झळकावले आणि 49 चेंडूत 81 धावा केल्या आणि 14 व्या षटकात 116 धावांवर बाद झाला. जोश इंग्लिशही त्याच षटकात 1 धावा काढून बाद झाला होता. याबरोबरच, ग्लेन मॅक्सवेलची बॅट आज शांत राहिली आणि त्याला 14 चेंडूत 12 धावाच करता आल्या. अखेरच्या सामन्यात टीम डेव्हिडने 19 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या मात्र त्याचे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले आहेत.

महत्वांच्या बातम्या :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *