Rajya Sabha Election: भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) भाजपकडून तीन नावे जाहीर करण्यात आली आहे. यात काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. पंकजा मुंडे, नारायण राणे आणि विनोद तावडे यांना डावलून भाजपने नवीन अशा गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Rajya Sabha Election: After leaving Pankaja Munde, Narayan Rane, BJP’s ‘these’ leaders have a big chance in the Rajya Sabha)
दरम्यान, अजित गोपछडे हे विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. अखेर त्यांना पक्षाकडून राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) उमेदवारीचं बक्षीस मिळालं आहे. भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayn Rane) यांना संधी दिली जाणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.
याशिवाय भाजप नेते विनोद तावडे(Vinod Tawde) यांच्यादेखील नावाची चर्चा होती. पण त्यांनाही संधी देण्यात आलेली नाही. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही राज्यसभा निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही. त्यामळे भाजपातील अनेक कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढंच नाहीतर पंकजा मुंडेंना भाजप डावलत असल्याचे देखील म्हंटले जात आहे.
Rajya Sabha Election: कोण आहेत अजित गोपछडे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नांदेड लोकसभा, नांदेड आणि नायगाव विधानसभेसाठी त्यांचं नाव कायम चर्चेत असायचं. सामाजिक, शैक्षणिक कार्यात ते अग्रेसर असतात असं सांगितलं जातं. महाविद्यालयात असताना मार्डच्या चळवळीचे गोपछडेंकडून नेतृत्व करण्यात आले होते. Rajya Sabha Election
ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :
- Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?
- IND vs ENG: नेमका जसप्रीत बुमराह कुठे गायब झाला?
- Viral Video: गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी पकडलं रंगेहाथ अन् झालं ‘मोये मोये’
- Bailgada Sharyat: नाद एकच बैलगाडा शर्यत! विजेत्यास मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट, कुठे आहे ही स्पर्धा?
- धक्कादायक!‘मुंबईला याल तर सगळे मराल’, विमानात सापडली धमकीची नोट