Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Sharad Pawar: पुणे। राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे. बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यातबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पुण्यातील पवारांचं निवासस्थान मोदी बागेत यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. (Sharad Pawar: Big news! Will Sharad Pawar group merge with Congress?)

दरम्यान, उद्या राज्यसभेच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याचा शेटवचा दिवस आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते आहे. पण काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत चाचपणी सुरु आहे. त्यासाठी खासदार आणि आमदारांची मत शरद पवार जाणून घेणार आहेत. याबाबतचं भाष्य शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी केल्याचे चर्चा होत आहे.

Sharad Pawar: शरद पवार गटाची पुण्यात मोठी बैठक

शरद पवारांनी (Sharad Pawar) लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची पुण्यात महत्वाती बैठक बोलवली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, आमदार अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, राजेश टोपे हे देखील उपस्थित आहेत. पण जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे मात्र अनुपस्थित आहेत. परंतु काँगेस मध्ये विलीन होण्याबाबत अजून तरी कोणतेही अधीकृत निर्णय घेतल्याचे समोर आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *