धक्कादायक!‘मुंबईला याल तर सगळे मराल’, विमानात सापडली धमकीची नोट

मुंबई। एक धक्कादायक बातमी मुंबईला येणाऱ्या लोकांसाठी मिळाली आहे. चेन्नईहून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या विमानात धमकीची चिठ्ठी सापडली आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. ही चिठ्ठी नेमकी कुणी दिली? असा प्रश्न विमानाच्या क्रू मेंबर्सना पडला होता. परंतु परिस्थितीलान घाबरता त्यांनी त्याचा सामना केला. विमान आकाशातच असताना हि नोट सापडल्याने हे खरंच गंभीर आहे. (Shocking! ‘Everyone will die if you come to Mumbai’, a threatening note was found in the plane)

दरम्यान, केबिन क्रूच्या निदर्शनास चिठ्ठी येताच त्यांनी तात्काळ कॅप्टनला कळवले. त्यांनतर कॅप्टनने तात्काळ एअर ट्राफिक कंट्रोलला या गंभीर प्रकारांची माहिती दिली. त्यामुळे विमान मुंबईत लँड करताच संपूर्ण विमानाची आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली. विमानात काहीही संशयास्पद न सापडल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं झालं काय?

इंडिगो एरलाईन्सच्या विमानामध्ये हा प्रकार घडला आहे. हे विमान चेन्नईवरून मुंबईला येत होते. याच विमानामध्ये ही धमकीची नोट सापडल्याची माहिती समोर आली आहे.  “मुंबईला याल तर सगळे मराल ”, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत होता. समोर आलेल्या माहितीनुसार, टिशू पेपरवर धमकीचा मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे विमान लँड होताच मुंबई पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्यात लक्षत घेता. कारवाईला सुरवात केली.

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज : 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *