Baramati Lok Sabha Election: देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातही सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. अशातच सर्वांचे लक्ष बारामती लोकसभे (Baramati Lok Sabha) कडे आहे. कारण बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्येच लढत होणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. जरी अजित पवार गटाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. परंतु सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल याचे संकेत मिळत आहेत. (Baramati Lok Sabha: Sunetra Pawar’s candidature for Baramati Lok Sabha confirmed? The campaign chariot will roll)
सुनेत्रा पवार यांचा प्रचाराचा रथ तयार
दरम्यान, बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदार संघात सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास फिक्स असल्याचे संकेत मिळत आहेत. फक्त आता याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागला आहे. त्यावर सुनेत्रा पवारांचा मोठा फोटो देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व परिसरामध्ये चर्चा होण्यास सुरवात झाली आहे.
सुनेत्रा पवार यांनी दौंडच्या भाजप आमदारांची घेतली भेट
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सध्या राजकारणामध्ये चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी बारामती लोकसभे मध्ये येत असलेल्या दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांची त्यांच्या राहत्या घरी राहू येथे जाऊन भेट घेतली आहे. आपल्याला माहिती असेल की राहुल कुल हे भाजपचे आमदार तर कांचन कुल २०१९ सालच्या बारामती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार होत्या.
दरम्यान, त्यांच्या या भेटीचे कारण सदिच्छा भेट म्हणून जरी असले तरी बारामती लोकसभेच्या (Baramati Lok Sabha) दृष्टीने दौंड तालुका फार महत्वाचा आहे. एवढंच नाही तर गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरा वाढला आहे. मागे आपण पहिलाच असेल की अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पराभूत करणार असे आव्हान दिले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा शिरूर दौरा म्हणत्वाचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचे दौरे अशा चर्चाना उधाण आणण्याचे काम करत आहेत.
ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :-
- Ind vs Eng 3rd Test: टेस्ट क्रिकेट मधील भारताच्या नावावर असलेले हे ३ लाजिरवाणे रेकॉर्ड
- IND VS ENG : सरफराज खानला कसोटी पदार्पणानंतर आला खास फोन, घ्या जाणून कोण आहे ‘सरफू’ची ती खास व्यक्ती
- Alipur Fire News: पेंट फॅक्टरीला आग लागल्याने ११ कामगारांचा होरपळून मृत्यू, ४ जखमी
- Viral News: दारूच्या नशेत पोरींची फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल