Mukesh Ambani: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहात पाहूणांना मिळणार ‘हे’ मोठं गिफ्ट

Mukesh Ambani: जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादी मधील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी(Anant Ambani) लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा शाही साखरपुडा पार पडला होता. या शाही कार्यक्रमाचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. (Mukesh Ambani: Anant Ambani-Radhika Merchant’s royal wedding will get ‘this’ big gift)

दरम्यान, आता लवकरच अनंत व राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्ना बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना एक विशेष भेटवस्तू दिली जाणार आहे. त्यामुळे आता सर्वच लोकांचे लक्ष त्यांच्या शाही लग्नाकडे लागले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आपल्या मुलाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना खास गिफ्ट देणार आहेत, त्यासाठी खास कारागिरांना ऑर्डर देण्यात आली आहे. जाणून घेऊया काय असेल ती खास भेट? कारण करोडपती घराण्याचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष लागून आहे. की गिफ्ट मध्ये काय मिळणार आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत व राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना भेट म्हणून एक खास मेणबत्ती दिली जाणार आहे. या मेणबत्त्या महाबळेश्वरचे अनुभवी कारागीर स्वत:च्या हाताने बनवणार आहेत. नीता अंबानींच्या (Nita Ambani) स्वदेश स्टोअर अंतर्गत या भेटवस्तू तयार करण्यासाठी अपंग कारागिरांना सहकार्य केले आहे, जेणेकरून जुन्या कारागिरीचा वारसा टिकेल.

दरम्यान, गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये अनंत व राधिकाचा साखरपुडा सोहळा  अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया (Antilia) या निवासस्थानी पार पडला. यामध्ये साखरपुड्याची जय्यत तयारी जगभराने पहिली. अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही लहानपणापासूनचे मित्र-मैत्रीण असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाच्या या सोहळ्याकडे देशभराचे लक्ष लागले आहे. Mukesh Ambani

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *