Sambhaji Nagar: कोण बेल्टने मारतोय तर कोण बुक्क्यांनी; शाळेतील पोरांची फिल्मी स्टाईल हाणामारी व्हायरल

Sambhaji Nagar News: अनेक वेळा किरकोळ वादावरून आपलं देखील शालेय जीवनामध्ये भांडण झालं असेलंच. आज देखील अनेक ठिकाणी शाळकरी मुलांच्यात अशी भांडणे होत असतात. अशा भांडणांचे व्हिडीओ देखील समोर येत असतात. अशाच एक भांडणाचा व्हिडीओ छत्रपती संभाजी नगर (Sambhaji Nagar) मधून समोर आला आहे.(Sambhaji Nagar: Who is hitting with belts and who is hitting with punches; Film style brawl of school boys goes viral)

दरम्यान, हा व्हिडीओ छत्रपती संभाजी नगर (Sambhaji Nagar) मधील बिडकीन गावातील असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मारहाण केली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला विद्यार्थ्यांचा घोळका उभा दिसतो आहे. सुरुवातीला घोळक्याच्या मध्ये काही विद्यार्थी भांडतान दिसत आहेत. त्यांनतर काही वेळानी त्यांच्यामध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी सुरु होते.

त्याचबरोबर इतर विद्यार्थी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला असतात. पण कुणीच त्यांच्यात मध्यस्थी करून मारहाण सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत. या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी नेमकी कशावरून झाली, याचं कारण मात्र अद्याप माहिती नाही. परंतु हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Sambhaji Nagar)

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *