धक्कादायक! जेवण करताना कुऱ्हाडीने मित्रानेच तोडली मित्राची मान; वाशिममधील घटना

Washim Crime: वाशिम। राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालेलं आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून गुन्हेगारीच्या काही ना काही घटना दररोज समोर येत असतात. अशीच एक हत्येचे घटना वाशिम मधून समोर आली आहे. किरकोळ वादातून मित्रानेच कुऱ्हाडीने मित्राची मन तोडून हत्या केल्याची घटना धक्कादायक समोर आली आहे. (Shocking! A friend broke his friend’s neck with an ax while eating; Incident in Washim)

दरम्यान, ही घटना वाशिमच्या(Washim Crime) कारंजा तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे. नेहमी सोबत राहणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राची मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केली. ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. या हत्येच्या घटनेमुळे टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मृतकाचं नांव संतोष घोरमोडे असून त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दारू प्यायल्यानंतर संतोष घोरमोडे आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाले. त्यांनतर संतोष आपल्या घरी जेवायला गेला. तो जेवत असतानाच त्याच्या मित्राने कुऱ्हाडीने त्याची मान तोडली. यामुळे संतोष घोरमोडे याचा मृत्यू झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

त्याचबरोबर, संतोष घोरमोडेच्या हत्याची माहिती मिळताच धनज बुद्रुक पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अंकुश वडतकर, पोलीस कर्मचारी शिवाजी ठवकर यांनी माहिती घेतली. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. परंतु या हत्येने परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *