Viral Video: सोशल मीडियावरती अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. परंतु यामधील अनेक व्हिडीओ हे हिंसा दाखवणारे असतात. असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. यामध्ये माणसांनी निर्लज्ज पानाचा कळस गाठला आहे. यामध्ये दोन व्यक्ती एका भटक्या कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत घेऊन जाताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा येथील आहे. यामध्ये दोन व्यक्ती अमानुषपणे कुत्र्याला दोरीने बांधून बाईकवरून खेचून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कुत्र्याचे पाय दोरीने बांधले आहेत आणि त्याला बाईकवरून फरफटत नेले आहे. हे भयावह कृत्य पाहून अनेक नेटकऱ्यांनी कंमेट सुध्दा केले आहेत. कुत्रा वेदनांनी ओरडत आहे.
दरम्यान, ही क्रुरता पाहून अनेक युजर्सींनी संताप व्यक्त करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिकंदरा पोलिस (Agra Police) स्टेशनच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.त्यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्याप आरोपीना पकडण्यात आलेले नाही. Viral Video
ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :
- Mumbai Fire: मुंबई येथील गोवांडी येथे लागलेल्या आगीत १० ते १५ घरांचे मोठे नुकसान
- Mukesh Ambani: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहात पाहूणांना मिळणार ‘हे’ मोठं गिफ्ट
- IND Vs ENG: राजकोट कसोटी मधून 500 विकेट पूर्ण करणारा गोलंदाज रविचंद्र अश्विनीने ‘या’ कारणांमुळे सोडला कसोटी सामना
- Borivali Fire: इमारतीच्या पार्किंगला आग; २५ ते २६ गाड्या जळून खाक Video Viral
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.)