Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024

Chhatrapati Shivaji Maharaj: “अशी मोडून काढली महाराजांनी वतनदारी” महाराष्ट्र धर्म स्थापण्यासाठी शिवरायांचं मोठं पाऊल…

Chhatrapati Shivaji Maharaj: आज अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांचा जन्मोत्सव सोहळा देशभरामध्ये ठीक ठिकाणी मोठ्या जल्लोशात पार पडणार आहे. आजच्या दिवसापासून रयतेच्या म्हणजेच सर्व सामान्य जनतेच्या राज्याला निर्माण करण्यासाठी माँ जिजाऊंनी एका वाघाला जन्म दिला होता. त्याच आपल्या महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य रयतेसाठी वेचले. अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र धर्म स्थापण्यासाठी महाराजांनी वतनदारी मोडून काढली होती. Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024

संदर्भ – ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लेखक – प्र. न. देशपांडे

एक काळ असा होता की महाराष्ट्रात वतनदारांची परंपरा निर्माण झाली होती. इस्लामी राज्यकर्त्यांनी या वतनदारी पद्धतीची जोपासना केली. हे वतनदार राज्यकर्त्यांना खूष करण्यासाठी प्रजेचा छळ करीत असत. बहमनी काळात वतनदारांनी महसूल गोळा करण्यासाठी रयतेवर किती निष्ठुरपणे अत्याचार केले हे तत्कालीन कागदपत्रावरून दिसते. त्याचप्रमाणे संत एकनाथांच्या काव्यामधूनही ते चित्र स्पष्ट होते. शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) रयतेचा छळ करणाऱ्या वतनदारांचा मनस्वी तिटकारा होता. 

वतनदारी पद्धती बंद करावी असा कठोर विचारही शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) केला होता. परंतु हा कठोर विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. पहिली अडचण म्हणजे वतनदारी पद्धती वंशपरांगत पद्धतीने चालत आली होती. दुसरी अडचण म्हणजे पाटील कुलकर्ण्यापासून देशमुख-देशपांड्यापर्यंत सर्व अधिकारी वतनदार होते.

या सर्वांची वतने नष्ट केली तर अराजक निर्माण होईल व हे असंतुष्ट वतनदार शत्रुपक्षाला जाऊन मिळतील अशी कायमची धास्ती वाटत होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यापासून अनेक मराठे वतनदार त्यांच्याविरुद्ध गेले.

दरम्यान, काहीजणांना राजे हे किताब असल्यामुळे ते स्वतःला शिवाजी महाराजांपेक्षा(Chhatrapati Shivaji Maharaj) श्रेष्ठ समजत असत. अशा वतनदारांविरुद्ध शिवाजी महाराजांना (Shivaji Maharaj) लढावे लागले. अफझलखानाने जेव्हा महाराजांविरुद्ध स्वारी काढली तेव्हा त्याने मावळ आणि वाई भागातील देशमुखांना शिवाजी महाराजांविरुद्ध चिथावले.

तीच गोष्ट पुढे मिर्झाराजे जयसिंगाने केली. तेव्हा वतन रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतलातर हे सर्व लोभी वतनदार बंड पुकारतील, आदिलशहा किंवा मुघलांना मिळतील आणि त्यामुळे स्वराज्यकार्यात दुर्धर समस्या निर्माण होतील याची जाणीव शिवाजी महाराजांना होती. म्हणून त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला.

सरसकट सर्व वतने रद्द करण्याऐवजी जे वतनदार पुंड झाले आहे व जे रयतेवर जुलूम करीत आहेत, त्यांना वठणीवर आणण्यासाठी अशा वतनदारांची वतने रद्द करण्याचे धोरण त्यानी स्वीकारले. समकालीन काही विश्वसनीय पत्रांतून बंडखोर व जुलुमी वतनदारांना शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) कसे नामोहरम केले याचे उल्लेख सापडतात. वतनदारांनी रयतेला गुलाम समजू नये असे महाराजांचे स्पष्ट मत होते.

सभासद लिहितो की, ‘मुलखात जमीनदार, देशमुख व देसाई यांचे जप्तीखाली कैदेत रयत नाही. याणी साहेबी’ करून नागवीन म्हटलियाने त्यांच्या हाती नाही. आहे ती वलने चालवावीत, परंतु नवी देऊ नये असे महाराजांचे एकूण धोरण होते.

अमात्य आपल्या आज्ञापत्रात लिहितात, ‘आहे वतन ते चालवून यांची सत्ता असू न द्यावी… नवी इनामे देऊ नयेत. वतनदारांना स्नेह आणि दंड या दोहोंमध्ये निक्षून ठेवावे, अमात्यांच्या विवेचनावरून शिवाजी महाराजांच्या धोरणाची पूर्ण कल्पना येते.Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024

(संदर्भ – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तर्फे प्रकाशित ‘छत्रपती शिवाजी महाराज’ पुस्तक, लेखक – प्र. न. देशपांडे)

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *